वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कॅटरॅक्ट / मोतीबिंदू म्हणजे अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्याची लेन्स ढगाळ होते, त्यामुळे दृष्टी धूसर होते. वयस्कर व्यक्तींमध्ये हे सामान्य असले तरी, पण इजा, वैद्यकीय स्थिती किंवा अतिनील किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा कॅटरॅक्ट होऊ शकतो.
दृष्टी ढगाळ किंवा धूसर होणे, प्रकाशात डोळे दिपणे, रात्रीच्या वेळेस कमी दिसणे, फिकट किंवा पिवळे रंग, दिव्यांभोवती वलय दिसणे आणि एका डोळ्याची नजर दुहेरी होणे ही कॅटरॅक्टची लक्षणे आहेत.
डोळ्यांचे विशेषज्ञ सामान्यतः तुमच्या विशिष्ट परिस्थितीच्या आधारावर एनेस्थीसियासाठी डोळ्यात टाकण्याची औषधे किंवा इंजेक्शन वापरण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून प्रक्रिये दरम्यान तुम्हाला आरामदायक वाटेल.
शस्त्रक्रियेचा प्रकार, निवडलेल्या लेन्सची गुणवत्ता (इंट्रऑक्युलर लेन्स) आणि तुमची विमा योजना यांवर कॅटरॅक्ट शस्त्रक्रियेचा खर्च अवलंबून असतो. हे सामान्यतः सुमारे ₹10,000 ते ₹2,00,000 पेक्षा जास्त असू शकते.
बहुतेक योजनांमध्ये शस्त्रक्रियेच्या खर्चाचा समावेश असतो, पण काही लेन्सच्या पर्यायांमुळे खर्च वाढू शकतो. एकूण खर्चाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही लवकरात लवकर भेटीची वेळ घ्यावी आणि त्यासाठी फोन किंवा ईमेलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधावा असे आम्ही तुम्हाला सुचवितो.
डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटलमध्ये आम्ही व्याजमुक्त ईएमआय सुविधा आणि 100% कॅशलेस शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देतो.